कोरोना च्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजला आहे कोरोनाच्या धास्तीने शहर, गाव, वाडी, वस्ती,तांडे यामध्ये राहणारे सर्वच नागरिक अनामिक भीती पोटी दहशती खाली आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राज्य सरकार कडून कोव्हि शिल्डचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रा अंतर्गत सुरू झाला असला तरी ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणा पासून वंचीत राहिलेला आहे त्याच्याकडे पाहण्याची तसदी अद्यापि प्रशासनाने न घेतल्याने त्यांच्या लसी करणासाठी यंत्रणा नेमके काय प्रयत्न करणार हे अद्यापि न उमगलेले कोडेच असून त्यासाठी यंत्रणा उभी करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन खेड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गौस खतीब यांनी केले आहे.
खेड,दापोली, मंडणगड या तीन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. वाढती रुग्ण संख्या थोपवणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेले असले तरी त्यावर पर्याय म्हणून राज्य सरकारकडून लसीकरणाची मात्रा देण्यात येत आहे. मात्र यामध्ये अनेक त्रुटी असून विशेषत: याचा फटका मात्र ग्रामीण भागाला बसत आहे.शहराच्या ठिकाणी अथवा शहरालगत असणाऱ्या गाव, वाड्या लसीकरणाच्या कक्षेत येत आहेत परंतु ज्या गावामध्ये लसीकरणाची मोहीम कशी यशस्वी होणार हाच खरा मुदा आहे. लसिकरणा साठी राज्य शासनाने ऑन लाईन हा पर्याय ठेवला असल्याने शहरा सारख्या ठिकाणी अनेक जण ऑन लाईन नोंदणी करून त्याचा लाभ घेत आहेत.मात्र ग्रामीण भागांत इंटरनेट चा अभाव असल्याने लसीकरण म्हणजे काय रे भाऊ ? असाच प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे.त्यांना कोणी वाली आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे.
खेड तालुक्यांमध्ये खेड नगरपरिषद दवाखाना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तिंसगी,आंबवली,तळे,वावे,फुरूस, कोरेगाव,शिव इत्यादी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत.खरेतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अखत्यारीत १२ ते १५ गावे आणि अंदाजे १६ ते १७ हजार लोकसंख्या येते. त्या तुलनेत लसीचे डोस हे दर दिवशी १५० च्या आसपास येत आहेत.त्यामुळे लसीचा अत्यंत तुडवडा जाणवत आहे.
दुसरा डोस चे नियोजन होत नसल्याने नागरिकांना मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे २८ व ४५ दिवस होऊन सुध्दा लस उपलब्ध होत नाही,कधी मिळणार खेड शहर व आजुबाजूच्या परीसरातील ६०० नागरीकांना दुसरा लसीकरणाचा डोस ६० दिवस उलटून गेले तरी अद्यापही मिळालेला नाही. तरी लसीकरणाचा डोस त्वरित उपलब्ध करून द्यावा तसेच फ्रंटलाईन वर काम करणा-या कर्मचाऱ्यांना देखील अद्याप लसीचा डोस मिळालेला नाही. त्यांना देखील डोस देणे गरजेचे असताना कोणतेही नियोजन नसल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नाव नोंदणी ही ऑनलाईन अॅपद्वावरे करणे बंधनकारक केली आहे. शासनाचा हेतू जरी स्वच्छ आणि चांगला असला तरी ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाईन अॅपद्वारे नावे नोंदणी त्वरीत आणि वेळेत करणे शक्य होत नाही.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील गावांमध्ये इंटरनेटची समस्या आहे.अनेक गावांमध्ये अद्याप मोबाईलला रेंज नाही.इंटरनेट सुविधा नाही त्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना लसीकरणासाठी आँनलाईन पध्दतीने नोंदणी करणे शक्य नाही.
याउलट प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता येणारे डोस हे खेड शहर आणि आजुबाजुच्या परीसरातील नागरीक नोंदणी करीत आहेत आणि विविध प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावुन घेत आहेत त्यामुळे आरोग्य केंद्रातील लसीचे डोस हे ग्रामीण भागातील जनतेला न मिळता शहरातील व आजुबाजूच्या गावातील जेथे इंटरनेट सुविधा वेगवान आहे तेथील नागरिक घेत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होत आहे.
सध्या रमजानचा महिना सुरू असून डोस घेण्यासाठी मुस्लीम समाजा ची संख्या ग्रामीण व शहरी भागात लक्षणीय आहे असे असताना कोणतेच नियोजन नसल्याने नेमकी लस उपलब्ध होणार की नाही याबाबत सावळा गोंधळ सुरूच आहे. मात्र प्रशासनने सर्व आरोग्य केंद्रावर ५०% टक्के ऑनलाईन आणि ५०% टक्के ऑफलाईन अशी लसीकरण नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.जेणे करून ग्रामीण भागातील जनतेला लसीकरणाचा लाभ घेता येईल तसेच सर्व सुचना या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे पाठवुन लवकरच यावर तोडगा काढावा
सद्यस्थितीत फ्रंट लाईन वर्कर , दिव्यांग व्यक्ती यांना देखील लसीकरण करणे गरजेचे आहे त्यांच्या साठी येथील प्रशासनाने यंत्रणा उभी करण्याची गरज आहे तरच दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत निभाव लागू शकेल अन्यथा सरकारी आकडे वाढण्यात वेळ लागणार नाही..