कोरोना महामारीच्या संकटातही राजापूर नगर परिषदेने आर्थिक वर्षात ७० टक्के करवसुली करण्यात यश मिळविले असले तरी शहरातील प्रांत कार्यालय, पंचायत समिती, बीएसएनएल यासह अन्य शासकीय कार्यालयांकडून सुमारे १५ लाख ८७ हजार ४५३रूपयांचा मालमत्ता कर येणे बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांकडून कारवाईची भीती दाखवून करवसुली करणारी नगर परिषद आता अशा प्रकारे करचुकवेगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या विरोधात कोणती कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.