देशात कोरोनाच्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे .देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला अद्याप कोरोनावरील लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. लसीकरणाला होत असलेल्या उशिरामुळे वाढत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार लसीच्या दुसऱ्या डोसमध्ये होणारा उशीर सप्लाय आणि इम्युन सिस्टिम या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो.
संशोधनामधून समजले की, जर लसीचा दुसरा डोस उशिराने प्राप्त झाला तर विषाणूसोबत लढणाऱ्या अँटिबॉडीचा स्तर २० ते ३०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अशा परिस्थितीत हे नवे संशोधन सिंगापूर आणि भारतासह अनेक देशांसाठी फायदेशीर ठरू शकते.
तर ३०० टक्के अधिक अँटिबॉडी निर्माण होणार