(मुंबई)
वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येने पालकांची चिंता वाढली आहे. शाळा पुन्हा बंद होणार का? कॉलेजेसच्या राहिलेल्या परीक्षा होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा रोखण्यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी विद्यार्थ्यांनी शाळेत किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.