कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरायच्या आत दुसरी लाटेने थोडे मार्गावर आलेले अर्थचक्रही मंदावले आहे. दरम्यान कर्जदार आणि व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. खऱ्या रथाने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आर्थिक उपाययोजना जारी केल्या आहेत. त्यासाठी कोण-कोण पात्र आहेत? त्यावर एक नजर…
सवलती काय आहेत
छोटे सामान्य कर्जदार तसेच लघुउद्योजक यांना त्यांच्या कर्जाची परतफेड सहजपणे करता यावी यासाठी काही बँकांना सूट देण्यात आली आहे.
25 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्यांना त्याचा लाभ होईल.
2022 कर्ज पुनर्रचनेबाबतची सुविधा मार्च, 2022 पर्यंत देऊ करण्यात आली आहे.
तुम्हाला ही सवलत मिळू शकते का
️31 मार्च 2021 रोजीपर्यंत 25 कोटी रुपयांहून कमी रकमेचे कर्ज घेतलेल्यांना हप्तेस्थगिती (मोरॅटोरियम) सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कर्जसवलतींचा लाभ ज्या कर्जदारांनी घेतला नव्हता, ते कर्जदार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या सवलतींचा लाभ घेऊ शकतात.
*उदा.* एखाद्या कर्जदाराने गत वर्षी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सवलतीचा लाभ घेत 8 महिने हप्तेस्थगिती केली असेल आणि त्याच्या कर्जाची पुनर्रचना केल्यानंतर कर्जाचा कालावधी 6 महिन्यांनी वाढला असेल तर असा कर्जदार पुढील 10 महिने मोरॅटोरियमचा लाभ घेऊ शकतो
तुम्ही ही सलवत घ्यावी का : या सवलतीसंदर्भात करसल्लागार सल्ला देतात कि, जर कोरोनामुळे तुमच्या उत्पन्नावर फारच गंभीर परिणाम झाले असतील तरच सवलत घ्यावी. हप्ते भरण्यासाठी तुम्ही सक्षम असाल तर ही सवलत घेऊ नका, असेही सल्लागार स्पष्ट सांगतात. कारण ही सवलत घ्यायची असेल तर सध्या तुम्ही जे हप्ते स्थगिती घेणार आहात त्यावरील व्याज पुढे वाढत जाईल आणि नंतर परतफेड तर करावीच लागणार आहे.