कोरोना काळात लॉकडाऊन मधे कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसदलाला मदत करण्यासाठी तत्पर अशा साठ पोलिस मित्र व शिक्षक यांना स्वतः ची काळजी घेण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी शहरच्यावतीने मास्क व सँँनीटायझर चा मदतीचा हात डी. वाय. एस. पी. सदाशिव वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, सरचिटणीस सचिन कोतवडेकर, उपस्थित होते.