व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक व्हेरिएंट सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटचा हवेतून प्रसार होण्याची क्षमता जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे. व्हिएतनाममधील 63 शहरांपैकी 31 शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सध्या याठिकाणी कोरोनाचे साधारण 3600 रुग्ण आहेत.