मुंबई-गोवा व रत्नागिरी-कोल्हापूर या महामार्गाच्या परिसरात वसलेल्या हातखंबा पंचक्रोशीमध्ये कोविड रुग्णांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू 10 ते 14 मे या कालावधीत लागू राहणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद राहतील. विनाकारण बाहेर फिरणार्यांकडून 500 रुपये दंड आकारणी करण्यात येईल. तसेच त्यांची कोरोना चाचणीही केली जाणार आहे.
15 मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या पाहून ग्राम कृतिदल दुकाने सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. बंद कालावधीत दुकाने उघडल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहेत. या कालावधीत हॉटेल, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, दूध, भाजी, मासे, मटण, व हार्डवेअर विक्रेते यांचीही दुकाने बंद राहतील. गावातील बँक सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे बंद राहतील. ताप, सर्दी, खोकला, जुलाब असे त्रास असल्यास ग्राम कृतिदलास तातडीने कळवण्याचे आवाहन दलाने केले आहे.