कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याचा जनक नेमका कोण आहे याबाबत अद्यापही वाद सुरू आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीन मात्र हा आरोप फेटाळण्यात आले, मात्र आता एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे. तेथील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असे वॉल स्ट्रीट जर्नलमधील रिपोर्टच्या आधारे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
डब्लूएचओच्या तपासात मदत मिळेल
वॉल स्ट्रीट जर्नललच्या रिपोर्टनुसार, चीनने जगासमोर कोरोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनासारखी लक्षणे होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला कोरोना महामारीची माहिती मिळाली होती. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टमध्ये नेमक्या किती संशोधकांना लागण झाली, त्याची वेळ, त्यांच्या रुग्णालयातील कालावधी यांची माहिती देण्यात आली असून यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
कोरोनाचा फैलाव नेमका कुठून झाला यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तपास करत आहे. यासाठी त्यांचे एक पथक वुहानमध्येही गेले होते. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्चित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र बायडन प्रशासन अद्यापही कोरोनाच्या पहिल्या दिवसांच्या बाबतीत चिंतीत असून अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगितले आहे. यामध्ये चीनमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचाही उल्लेख आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रविवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दौऱ्यात वुहानमधील प्रयोगशाळेतून संसर्ग झाल्याची शक्यता नाकारली होती याकडे लक्ष वेधले होते.
Post Views: 37