रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती पाहता. रत्नागिरीतील ग्रामीण भागात पन्नास बेडची ४ काेविड रूग्णालये, रत्नागिरी शहरात शंभर बेडचे अद्ययावत काेविड व्हेंटिलेटर रूग्णालय, जिल्ह्यासाठी ऑक्सिजन बँक व ३ अँम्ब्युलन्स आदी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
कोरोना काळात रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था उभी करण्याबाबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पत्र दिले. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीसाठी १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक, रत्नागिरीच्या चार वेगवेगळ्या तालुक्यात ऑक्सिजन सुविधेसह ५०-५० बेड्सचे कोविड सेंटर तर खासदार नारायण राणे साहेब व माजी खासदार नीलेश राणे आणि कुटुंबीय यांच्या मदतीने येथे आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जातील असे यावेळी सांगण्यात आले.