(खेड / इक्बाल जमादार )
खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव या ठिकाणी आरोग्य केंद्र परिसरामध्ये विद्युतीकरणाचे दिवे नव्हते. सदरचे दिवे लावण्यासाठी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. मोरे आरोग्य सेविका सानिका देवलेकर (चव्हाण) यांनी संगलट गावचे सुपुत्र आणि उद्योजक तसेच मुस्लिम समाज चिपळूण तालुक्याचे कार्याध्यक्ष नाझीम भाई अफवारे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी त्यांच्याबरोबर संगलट गावचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार उपस्थित होते.
यावेळी रुग्णालयाच्या परिसरातील दिवे नाजीम भाई अफवारे यांनी देणगी स्वरूपात देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच खेड तालुक्यात प्रसिद्ध असलेले प्राथमिक आरोग्य कोरेगाव यांना यापुढे जे काही सहकार्य लागेलं ते आपण देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या सहकार्यासाठी वैद्यकीय अधिकारी श्री पवार, श्री मोरे, आरोग्य सेविका सानिका देवलेकर तसेच भाऊसाहेब यांनी उद्योजक आणि बिल्डर नाझीम भाई अफवारे यांचे विशेष आभार मानले.