(मुंबई)
आजकाल फ्राॅड करण्यासाठी नवनवीन प्रकार अवलंबले जात आहेत. आता या नवीन आँनलाईन फ्राॅड प्रकारामध्ये अनोळखी नंबरवरून तुमच्या खात्यात जाणूनबुजून शे-दोनशे रुपये पाठवले जातील. त्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला कॉल करेल आणि ‘चुकून’ पैसे पाठवल्याचे सांगून विनंती करत पैसे परत करण्यास सांगेल. सावध राहा… फसवणूक करून तुमचे खाली होण्याची ही वेळ आहे.
राज्यात अनेक जण नव्या प्रकारच्या आर्थिक घोटाळ्याचे बळी गेले आहेत. गेल्या १६ दिवसांत मुंबईत सुमारे ८१ जणांकडून १ कोटींहून अधिक लुटीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बँक फसवणूक अभिनव पद्धतीने केली जात आहे. ऑनलाइन पैसे पाठवणारे अॅप वापरून ही फसवणूक केली जात आहे. आपणाला अशा प्रकारचा कोणताही फोन काॅल आला तर सावध राहा. कारण तुम्ही मालवेअर हल्ल्याचे बळी पडू शकतात.
जेव्हाही आपण अशा प्रकारे परतावा देतो तेव्हा मालवेअर अॅप फसवणूक करणाऱ्यांच्या हाती त्यांचा संपूर्ण डेटा आणि इतर केवायसी दस्तऐवज इत्यादी लागू शकतो. हे फसवणूकीसाठी पुरेसे आहेत. कारण त्यानंतर थेट बँकेवर अथवा त्यांची पिळवणूक करून बँक खाती हॅक केली जात आहेत.