कोकण रेल्वे मार्गावरच्या तब्बल 12 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे पाच डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे हा मार्ग सुरळीत करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील 01165 लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुरु ही गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 10103 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव (मांडवी एक्स्प्रेस), 01171 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष गाडी, 20112 मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (कोकणकन्या एक्स्प्रेस), 11004 सावंतवाडी दादर (तुतारी एक्स्प्रेस), 01172 सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, 11099 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस या 1 ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
07104 ही मडगाव ते पनवेल मार्गावर धावणारी गाडी रत्नागिरी स्थानकापर्यंत धावेल. 01172 सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धावणारी गाडी पनवेलपर्यंत धावेल. 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी पनवेलवरुन सुटेल.
दरम्यान, 12450 ही चंदीगड ते मडगाव गोवा संपर्क क्रांती रेल्वे, 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही जनशताब्दी रेल्वे आणि 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम सेंट्रल या रेल्वेंच्या मार्गात बदल केला आहे.
कल्याण स्थानकावरुन या रेल्वे पुणे, मिरज, लोंढामार्गे मडगाव जंक्शनवर येतील आणि तिथून पुढे मार्गक्रमण करतील. ताज्या अपडेट व अधिक माहितीसाठी कृपया कोकण रेल्वे कंट्रोल रूमशी संपर्क करावा.
https://x.com/KonkanRailway/status/1708415987291488494?s=20
Cancellation and diversion of Trains @RailMinIndia @Central_Railway @WesternRly @GMSRailway @TCS pic.twitter.com/KiYNPssqTZ
— Konkan Railway (@KonkanRailway) October 1, 2023