(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
कु. निलिमा चव्हाण हिच्या खून प्रकरणातील आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई होणेबाबत कोकण युवक परिषद खेड तर्फे खेड उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार व खेड पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. दि. २९/०७/२०२३ रोजी मौजे ओंबळी, ता. चिपळूण येथील युवती कु. निलिमा चव्हाण हिचा अत्यंत क्रूर पध्दतीने घातपात करण्यात आला आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आणि माणसातील राक्षसाचे दर्शन घडवणारी आहे.
निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या दापोली येथे कार्यरत होती. गेल्या महिन्याच्या शनिवारी 29 जुलै 2023 ला निलीमा चव्हाण दापोलीहून बॅँकेच्या शाखेतून घरी ओमळी चिपळुण येथे येण्यास निघाली होती. या प्रवासा दरम्यान ती वाटेतच बेपत्ता झाली होती. या दरम्यान साधारण दोन दिवस तर तिचा पत्ताचा लागला नव्हता आणि 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला होता.
या मृतदेहाच्या डोक्यावरील संपूर्ण केस नष्ट करण्यात आले होते, तिच्या भुवय्या देखील काढण्यात आल्या होत्या. अत्य्ंत वाईट अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावले होते. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने हे नीच कृत्य केल्याची माहीती आहे. त्याचसोबत नीलिमावर सामूहिक बलात्कार झाल्याचाही संशय आहे. नीलिमावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांनी संशय आहे’
दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात दापोलीतून खेड येथील एसटी स्टॅंडच्या सीसीटीव्हीत निलीमा चव्हाण दिसली होती. त्याचसोबत खेडमध्ये एका मुलीबरोबर चिपळूणला जाणाऱ्या गाडीत बसताना देखील सीसीटीव्हीत दिसली होती.या एसटी प्रवासानंतर ती बेपत्ता झाली होती. ती नेमकी कोणत्या बस स्टॅँडवर उतरली आहे, याची देखील माहिती समोर आली नाही आहे. तसेच तिचा मोबाईल नंबर बंद दाखवत होता. तपास यंत्रणेने तिचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन 29 जुलैच्या रात्री 12.05 वाजता रेल्वेस्टेशन अंजनी येथे दाखवत होते. तेव्हापासून तिचा फोन बंद दाखवत आहे.