(रत्नागिरी)
कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुरत्न कलावंत मंच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गजिल्ह्यांमध्ये कोकण चित्रपट महोत्सव साजरा होत असून रत्नागिरीमध्ये,रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त ) रत्नागिरी आणि सिंधुरत्न कलावंत मंच या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणाऱ्या या सभारंभात गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त ) रत्नागिरी तसेच भारत शिक्षण मंडळाच्या डी जी के कॉलेज मध्ये सुध्दा चित्रपट स्क्रिनिंग होणार आहे.
कोकण चित्रपट महोत्सव कार्यक्रम रूपरेषा दि. ११.१२.२०२३ दुपारी 2.00 शोभायात्रा- ग्रंथालय ते राधाबाई शेट्ये सभागृह
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी, दुपारी 2.30 उद्घाटन समारंभ, दीपप्रज्वलन, सूत्रसंचालन- डॉ.आनंद आंबेकर, समन्वयक – कोकण चित्रपट महोत्सव, स्वागत- प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रस्तावना -विजय पाटकर, अध्यक्ष -सिंधुरत्न कलावंत मंच, प्रमुख पाहुणे -श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्याध्यक्षा -रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, श्री.सतिश शेवडे -कार्यवाह -रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, श्री.विजय राणे – कार्यवाह – सिंधुरत्न कलावंत मंच, श्री.प्रकाश जाधव -सह कार्यवाह-सिंधुरत्न कलावंत मंच, परिसंवाद – सूत्रसंचालन – डॉ. आनंद आंबेकर, सहभाग – विजय पाटकर आणि विजय राणे, आभार -विजय राणे
दिनांक 12 डिसेंबर 2023, सकाळी 11 वाजता – चित्रपट स्क्रिनिंग, दगडी चाळ 2, प्रमुख भूमिका – अंकुश चौधरी, पूजा सावंत
स्थळ – इंटरॅक्टिव्ह हॉल, भारत शिक्षण मंडळाचे डी.जे.के.महाविद्यालय रत्नागिरी. दिनांक 13 डिसेंबर 2023, सकाळी 11 वाजता – चित्रपट स्क्रिनिंग, सरला एक कोटी, प्रमुख भूमिका – ओंकार भोजने, स्थळ – राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी. दिनांक 14 डिसेंबर 2023 सकाळी 11 वाजता – चित्रपट स्क्रिनिंग, बॉईज 3, प्रमुख भूमिका – पार्थ भालेराव, पूनम भागवत, स्थळ – राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी.
दिनांक 15 डिसेंबर 2023, सकाळी 11 वाजता – चित्रपट स्क्रिनिंग, गोष्ट एका पैठणीची, राष्ट्रीय पारितोषिक विजेता मराठी चित्रपट, स्थळ – इंटरॅक्टिव्ह हॉल, भारत शिक्षण मंडळाचे डी.जे.के.महाविद्यालय रत्नागिरी, रत्नागिरीमधील समारोप समारंभ, भारत शिक्षण मंडळाचे डी जी के कॉलेज मध्ये होणार आहे. दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी मालवण येथे अनेक नामवंतांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे यावेळी अनेक चित्रपट कलावंत उपस्थित राहणार आहेत.