(ठाणे / उदय दणदणे)
मुंबई उपनगरात कोकणी चाकरमान्यांनी गजबजलेल्या प्रति कोकण दिवा नगरीत कोकणची बहुप्रिय लोककला जाखडी नृत्य शक्ती – तुरा ही कोकणातील पारंपारिक लोककला मोठ्या उत्साहाने सादर होत असून दिवावासीयांना या मोसमात आगामी कार्यक्रमातुन दोन नामवंत शाहिरांचा दर्जेदार असा शक्ती-तुराचा जंगी सामना पाहण्याची संधी उपलब्ध होत आहे.
श्री अनंत महाडिक, श्री उमेश भानसे, श्री संतोष दोडकडे, श्री उदय जंगम, श्री श्रीकांत जंगम यांच्या सहकार्याने “मित्र मंडळ -दयाळ” ता.खेड जि. रत्नागिरी आयोजित शक्ती- तुऱ्याचा जंगी सामना रायगडचे लोकप्रिय शक्तीवाले शाहिर- विजय पायकोळी शाखा- शिवशक्ती नाच मंडळ -मेंदडी ता.म्हसळा जि.रायगड व सांस्कृतिक समाज भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तुरेवाले शाहिर- योगेश मुकनाक शाखा- श्री जगाई देवी नृत्य कलापथक काजूर्ली( गोणबरे वाडी) ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी, अशा दोन सुप्रसिद्ध शाहिरांच्यात हा शक्ती-तुरा सामना शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ.०७ वाजता आकांक्षा हॉल आगासन रोड,बी.आर. नगर दिवा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवा नगरीत या मोसमातील लक्षवेधी अशी जुगलबंदी पाहण्याची मुबंई उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांना ही सुवर्ण संधी असून अधिक माहितीसाठी अनंत महाडिक-९८९२७६४४३९, मनोज जाबरे-९५९४८५७३६७, उमेश भानसे-९९२०७०६५५७, निलेश यादव-९१६९५२३११ या नंबर संपर्क साधावा तरी तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.