( मुंबई )
गेल्या दोन दिवसांच्या थंडीने कोकणातील जनता त्रस्त असताना आता आणखी धक्का देणारी बातमी आली आहे. उत्तरेकडील शीतलहरींची तीव्रता वाढल्याने पुढील हुडहुडी दोन-तीन दिवस आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारीपट्टी भागात, उत्तर महाराष्ट्रात काही भागांत १८ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ४८ तास थंडीचा ‘रेड अलर्ट’ प्रशासनाने जारी केला आहे.
कोकणातील गारठा आणखी दोन दिवस वाढणार आहे. असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्तरेकडून पश्चिमी चक्रवातांची मालिका सुरू असल्यामुळे उत्तरेकडील राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट नोंदविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील 2 दिवस काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.