(रत्नागिरी / प्रतिनिधी )
आजकालच्या जमान्यात विवाहोत्सुकांसाठी सुयोग्य वधू-वर शोधणे फार जिकरीचे बनले आहे. आपला मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी पुरेसा वाव मिळत नसल्याने, अनेकवेळा अवघे आयुष्य बदलून टाकणारा हा निर्णय एक किंवा दोन स्थळे पाहूनच घ्यावा लागतो. हल्लीच्या या धावपळीच्या युगात पहिल्यासारखे नातेवाईक अथवा मित्रमंडळीही अपेक्षित स्थळे सुचविताना दिसत नाहीत. तर अनेकवेळा वधू वरांची परिपूर्ण माहितीही उपलब्ध होत नसल्याने आपली द्विधा मनस्थिती होत असते. यासाठी ‘ना मध्यस्थी, ना एजंट’ अशी कार्यपद्धती असलेली व विवाहोत्सुकांचा परिपूर्ण डेटा असलेली माहिती https://kokanvivah.in/ या वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोकणासह महाराष्ट्रातील विवाहोत्सुकांची गरज ओळखून अनुरुप स्थळे शोधण्यासाठी कोकण विवाह संस्थेमार्फत https://kokanvivah.in/ या वेबसाईटच्या माध्यमातून वधू वरांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. घरबसल्या एकाच छत्राखाली अनेक स्थळे पाहता यावीत, पसंतीला वाव मिळावा, आपला मनपसंत जोडीदार अनेक स्थळांमधून निवडता यावा यासाठी ‘कोकण विवाह’ चे डिजिटल दालन सुरू करण्यात आले आहे. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने या वेबसाईटवरून विवाहोत्सुकांची नोंदणी घरबसल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरून मोफत करता येणार आहे. तर मेंबरशिप घेणे हा पर्याय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे.
https://kokanvivah.in/ या वेबसाईटवर अनेक अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच वेबसाईटवर फेक डेटा टाळण्यासाठी ई-मेल व्हेरिफिकेशनचा पर्याय अनिवार्य ठेवण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण नोंदणी करताना दिलेल्या मेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक पाठविली जाते, ती लिंक व्हेरिफाय केल्यावरच आपले अकाऊंट (नोंदणी फॉर्म) ॲक्टीवेट होते. तसेच नोंदणी फॉर्ममध्ये सुयोग्य स्थळासाठी आपण नमूद केलेली अपेक्षा, वय, जात, ठिकाण वा नोकरीबाबत अपेक्षा आदी गोष्टी सॉफ्टवेअर द्वारे सर्च होऊन योग्य व मॅचिंग अशीच स्थळे आपल्याला दिसणार आहेत. सरसकट सर्वांना नोंदणी झालेली सर्वच स्थळे यामध्ये दिसणार नाहीत. यासाठी क्वीक सर्च, बेसिक सर्च, ॲडव्हान्स सर्च, कीवर्ड सर्च, लोकेशन सर्च, आय.डी सर्च, ऑक्क्युपेशन सर्च असे विविध पर्याय ठेवण्यात आले आहेत.
कोकण विवाह डॉट इन या वेबसाईटच्या होम पेजवर सर्वांना समजेल अशी रचना ठेवण्यात आली आहे. यामध्ये आकर्षक प्रोफाइल नमुना, प्रोफाइल एडिट, SMS अलर्ट, मेसेज पाठवणे, प्राप्त करणे, प्रतिसाद देणे, आपले स्वारस्य व्यक्त करणे, नामंजूर करणे अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच वन वे मॅच, टू वे मॅच, ब्रॉऽड् मॅच, कस्टम मॅच, प्रिफर्ड मॅच असे विविध पर्यायही ठेवण्यात आले आहेत. तर शॉर्टलिस्ट प्रोफाईल, ब्लॅकलिस्ट प्रोफाईल, आपण किती प्रोफाईल पहिल्या, आपली प्रोफाईल कोणी पहिली, कोणी लाईक केली आदी तपशिलही आपल्या अकाऊंटवरील डॅशबोर्डच्या माध्यमातून समजणार आहे. आपला फोटो ठरविक जणांना दिसण्यासाठी कींवा न दिसण्यासाठी फोटो पासवर्डही ठेवता येणार आहे. तसेच आपल्या जन्मपत्रिकेसह आपले आपले वेगवेगळे एकूण ६ फोटोही यामध्ये अपलोड करता येणार आहेत.
संबंधित वधू वरांनी नोंदणी फॉर्ममध्ये दिलेली माहिती स्वतः नमूद केलेली असते, विवाहासंदर्भात अंतिम बोलणी करण्यापूर्वी नोंदणीमध्ये दिलेल्या माहितीची खातरजमा अवश्य करावी. फॉर्म ऑनलाईन नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास अथवा काही शंका असल्यास वेबसाईटवरील रत्नागिरी सपोर्ट मोबाईल क्रमांकावर अथवा सपोर्ट मेलवर संपर्क साधावा. अनुरुप स्थळे शोधण्यासाठी कोकण विवाह संस्था (रत्नागिरी) मार्फत सुरू करण्यात आलेल्या या मोफत डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ कोकणासह महाराष्ट्रातील विवाहोत्सुकांनी घ्यावा, असे आवाहन संस्था संचालकांनी केले आहे.