(ठाणे / उदय दणदणे)
कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई, हिरक महोत्सव व कलारत्न पुरस्कार सोहळा-२०२३ रविवार दिनांक- २९ जानेवारी २०२३ रोजी, दामोदर नाट्यगृह परेल -मुंबई येथे प्रमुख मान्यवर अतिथी आ.भरतशेठ गोगावले (विधी मंडळ पक्ष प्रतोद) नामदार दिपक केसरकर (शालेय शिक्षण मंत्री) विठ्ठल चिविलकर (कुणबी बँक चेअरमन), नथुराम (भाई ) सोनगरे, रवींद्र मटकर (अध्यक्ष-नमन लोककला संस्था), इकबाल चांदले, एकनाथ सुकूम, बशीरभाई हजवानी (उद्योजक /समाजसेवक) अनंत बाईत, मा.समीर रेवाळे (युवा अध्यक्ष-महाड पोलादपूर), दिपक महाडिक (सचिव- कुणबी समाजोन्नती संघ- महाड-पोलादपूर) तसेच कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष अनंत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस-संतोष धारसे यांच्या विशेष सूत्र संचालनात हा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तद्नंतर उपस्थित मान्यवर, रसिक स्वागतार्हर्थ सुप्रसिद्ध शाहीर तुषार मधुकर पंदेरे यांनी भेदिक शाहिरी तर शंभूराजू घराण्यातील शाहीर अनंत व सखाराम, मंडणगड पालेकोंड या मंडळींनी तमाशा कला सादर केली त्याचबरोबर जाखडी नृत्य सादरीकरणातुन शक्तीतुरा कलेचे नामवंत कवी शाहीर प्रकाश पांजणे यांच्या गोड आवाजाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.अगदी सर्वच सादरकर्ते यांनी उपस्थितांची मने जिंकली.
सदर “हिरक महोत्सवानिमित्त” संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे या संस्थेची सेवा केली व संस्थेशी एकनिष्ठ राहून कोकणची ही लोक कला गावागावात घराघरात पोहचवली, वाढवली बहरवली अशा अनेक शाहीर वस्ताद गुरुवर्य मंडळींना कलगी तुरा “कलारत्न पुरस्कार -२०२३” ने शाल, पुष्पगुच्छ,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले असे सत्कार मूर्ती- नथुराम (भाई )सोनगरे- (कलगी-तुरा घटनाकार /उद्योजक ,( मु.सडे मंडणगड) , शंकर भिकाजी दळवी (मु.देवघर ता.खेड), पांडुरंग दाजी देवळेकर (मु.तुर्भे खोंडा ता.पोलादपूर), नथुराम जानू पाटील (मु.मुसडी ता. मुरुड), दत्ताराम शंकर गुरव (मु.दोनवडे ता.राजापूर), सुरेश बाबू ऐनारकर (मु करक ता.राजापूर), रावजीबुवा तुळसणकर (मु.नांदगाव), सूर्यकांत दत्ताराम चव्हाण (मु-वलंग ता.महाड),चंद्रकांत लक्ष्मण गोताड (मु.झरेवाडी, हातखंबा ता.जि.रत्नागिरी), नारायण विश्राम चापडे (मु.वाघ्रट ता.जि.रत्नागिरी), पांडुरंग पुतळाजी बाईत (मु.तुळसी ता.मंडणगड), बाळकृष्ण यशवंत तुरे (मु.टाळसुरे ता.दापोली), रामचंद्र गोविंद मालप ( मु.कांबळे लावगण-सैतवडे ता.जि. रत्नागिरी), सखाराम महादेव कळबटे (मु.मालगुंड ता.जि.रत्नागिरी), सोमा (अप्पा) गोपाळ फडकले (मु.तुरळ ता. संगमेश्वर), नारायण कृष्णा पालवकर (मु.कुरतडे ता.जि.रत्नागिरी), गणपत रोंगा गुरव (मु.आंबवपोंक्षे ता.संगमेश्वर), अनंत गणू तांबे (मु.दाभिळ ता.दापोली) दिपक कृष्णा देवळेकर (मु.पिरलोटे ता.खेड), शांताराम (भाऊ) पवार, (मु. मुरादपूर देवरुख) ता.संगमेश्वर) मधुकर ग.पंदेरे (मु.केळवली ता.लांजा), अनिल पांडुरंग सावंत (मु.ता.महाड), रामचंद्र घाणेकर (मु.पो.पडवण ता.तळा), प्रभाकर श्रीराम चोरगे (मु.काळकाई कौंड ता. दापोली), मनोहर मोरे (मु.सुर्ले ता.मंडणगड) सुरेश सखाराम चिबडे ( मु.बेबलघर ता.महाड), अनंत गणपत येलमकर (मु.आतखोल ता.मंडणगड) शंकर विठ्ठल भारदे -गुरुजी (मु.पो.टेटवली ता.दापोली) अशा जेष्ठ शाहीर, लोककलावंतांना कलगी तुरा “कलारत्न पुरस्कार-२०२३” ने गौरविण्यात आले.
संस्थेच्या ह्या हिरक महोत्सव आनंद सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक, रसिक यांचे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ (मुंबई )वतीने आभार मानन्यात आले असून मंडळाच्या आजवरच्या वाटचालीत आपण सर्व सोबत आहात म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास सुखरूप झाला. पुढील प्रवासात ही आपली साथ लाखमोलाची असेल अशी सदिच्छा व्यक्त करत संस्थेच्या वतीने अध्यक्ष-अनंत तांबे सरचिटणीस-संतोष धारशे यांनी आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष-अनंत तांबे , उपाध्यक्ष-सुरेश ऐनारकर , सुरेश चिबडे, सरचिटणीस- संतोष धारसे, चिटणीस – सुधाकर मास्कर, खजिनदार -सत्यवान यादव, वादविवाद अध्यक्ष – शंकर भारदे, उपाध्यक्ष- चंद्रकांत धोपट, सदस्य-अनंत मुंगळे, दिपक म्हादये, सुरेश कदम, निलेश जोगळे, सुनील मोगरे, दामोदर गोरिवले, दिलीप नामे, उदय चिबडे, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले त्याचप्रमाणे समीर रेवाळे, संदेश करकरे, जितेंद्र धारसे प्रसिद्धी प्रमुख- उदय दणदणे, आजी माजी पदाधिकारी सदस्य यांच्या विशेष मेहनतीने सदर हिरक महोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.