(रत्नागिरी)
ईद ए मिलाद हा मुस्लिम समाजाचा सण येत्या 29 रोज़ी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे फैजाने अत्तार कोकणनगर येथे लहान मुलांची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सदर रॅली ही कोकणनगर परिसरामध्ये काढण्यात आली. या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेस जरीवाला, मौलाना अल्ताफ कूरेशी, अकील मेमन, नाझीम अहमद रजा तसेच इतर सदस्य उपस्थित होते.