(शाहीर – नितीन रसाळ)
“कोकणचा शक्ती तुरा” या व्हॉट्सॲप गृपची उत्पत्ती 14 ऑक्टोबर 2014 साली झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक उमदा तरुण पिढीला या एका माळेत बांधणारा अवलिया म्हणजेच चळवल्या शाहीर मंगेश यादव. व्हाट्सएप हा सोशल मीडिया म्हणजेच त्यावेळी आपल्या साऱ्यांसाठी नवखा प्रयोग, पण अल्पवधीतच या ग्रुपला अनेक शाहिर जोडले गेले. त्यातून दिग्गज शाहीरांची ओळख होत गेली. अनेकांची साथही लाभली, नव्याने ओळखी झाल्या. ओळख वाढली अन आम्ही एकत्रित येण्याचा निर्धार केला पण नेमकं जमायचं कुठे आणि योग जुळून आला तो जिथे अवघा महाराष्ट्रच काय तर संपूर्ण देशातील अनेक दिगग्ज नेते ही ज्या मैदानावर घडले आणि देश चालवायला शिकले असे मुलुख मैदान ज्याला म्हटलं जात ते शिवतीर्थ म्हणजे दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या उद्यानात.
आम्ही मोजके सोळा जण एकत्र आलो. गाठी भेटी झाल्या एकमेकांना हातभेट झाली. त्यात प्रामुख्याने शाहीर मंगेश यादव, शाहीर विकास लांबोरे, शाहीर सदानंद सरवदे, शाहीर सचिन धूमक, शाहीर संतोष कोलापटे, शाहीर संदीप मोरे, दिवंगत शाहीर प्रकाश बुरटे, शाहीर भरत गानेकर, शाहीर अनंत बावकर, शाहीर सुधाकर गोणबरे, शाहीर बलराम तांबे, शाहीर विनोद फटकरे, शाहीर भिकाजी भुवड, शाहीर सुरेंद्र जाधव योगेश कातकर, शाहीर किशोर धनावडे, शाहीर प्रकाश सावर्डेकर, शाहीर संतोष कलमकर शाहीर उदय काटकर आणि शाहीर नितीन रसाळ अशी ही जोड गोळी एकत्रित येत निर्धार केला तो कोकणचा शक्ती तुरा या लोककलेच संवर्धन करायचं.
पहिल पाऊल उचलले ते प्रथम आपण एक शक्ती तुरा कार्यक्रम दामोदर नाट्यगृहात करायचा, शाहीर आपल्याच ग्रुपमधील जे आपले ध्येय, उद्दिष्टे गाठण्यासाठी सहकार्य करतील. मग निवड झाली ती नवखा शाहीर आता रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला शक्तीवाले शाहीर बिनेश वाजे ❌ तुरेवाले सुरेंद्र जाधव यांच्यात सामना रंगला रसिकांनी भरभरून प्रतिसाद ही दिला.
नव्या उमेदीची नवी नांदी अशी ठळक ओळ. नव्या नांदीची सुरुवात आणि खऱ्या अर्थाने या चवळीतील समाविष्ट झालेल्या प्रत्येक शाहिराने सहकार्य केले. कार्यक्रम झाला अन पुन्हा मुंबईत रंगमंचवर वारे गाजू लागले ते महिला पुरुष शक्तीतूरा त्यात वाढलेली अश्लीलता थांबविण्यासाठी आम्ही कलगीतुरा मंडळाच्या हे तरुण संपर्कात आलो आणि पुढे सरसावले ते प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला जातींने हजर राहून एक सरन्यायाधीश म्हणून एक वकीलही सोबत होतेच, त्यामुळे काय वेगळीच एक दिशा ऊर्जा मिळत गेली.
अश्लीलतेला आळा बसवायचा आणि महिला पुरुष कार्यक्रमांना विरोध करायचा हे ठरलंच. महिला ❌ महिला कार्यक्रमांना आमचा मुळीच विरोध नव्हता त्यामुळे रसिकांची साथ मिळत गेली, आणि काही दिवसातच आम्ही यशस्वीही ठरलो. परंतु काहींना या गोष्टी करत असलेल्या पटत नव्हत्या त्यांनी आम्हाला विरोधही केला. परंतु आम्ही न डगमगता कामात व्यस्त राहिलो. अशा या “कोकणचा शक्ती तुरा” ग्रुपची ख्याती अजूनही काहींच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.
आज या “कोकणचा शक्ती तुरा” व्हाट्सएपच्या ग्रुपला ८ वर्ष पूर्ण होतायत, याचा आनंद मनात वाटतो. त्यातूनच एका नव्या समूहाची सुरवात केली गेली ते शाहिरी दणका! त्यामुळे हे दोन हिरे म्हणजेच शाहीर मंगेश यादव व शाहीर सदानंद सरवदे तुम्हाला दोन्ही मातब्बर शाहिरांना मानाचा जय महाराष्ट्र🚩