(देवरूख / सुरेश सप्रे)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढ्रणमध्ये सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे येथे भुस्खलन झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. एका घरावर दरड कोसळलेने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तालुका प्रशासन अलर्ट मोडवर आलेले आहे. खबरदारी म्हणून कोंढरण गावातील १५घरातील ४७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंढरण गावातील पुन्हा स्थळ पाहणी केली असता तिथे पडलेल्या भेगांची संख्या आणि सातत्याने मोठ्या होणाऱ्या भेगा पाहता तेथील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार तेथील १५ कुटूंबातील ४७ लोकांना स्थलांतरीत करणेत आले. तर त्यांपैकी २८ लोकांची सोय तुळसणी विद्यालयात करणेत आली आहे. तसेच उर्वरित १९ लोकांना त्यांचे नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करणेत आले आहे. सदर स्थलांतर हे पूर्ण झाले असून तेथे आपत्कालीन व्यवस्थापनाने खबरदारीची उपाय योजना करणेत आलेली आहे.
गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देणेत आलेला आहे..
या घटनेची त्वरीत दखल घेत तहसिलदार अमृता साबळे. गटविकास अधिकारी भरत चोगले. पोलिस निरीक्षक उदय पोवार यांचे सह माजी आम. सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तातडीने स्थानिकांना स्थलांतर करणेसाठी प्रशासनाच्या मदतीने उपाय योजना केली असलेने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आजही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्या परिसरात भेगा पडून भुस्खलन होत असून पडझड होणेची शक्यता असल्याचे समजते.