(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे कोंढे ग्रामपंचायत, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र, अपरांत हॉस्पिटल, नॅब हॉस्पीटल, लायन्स क्लब, लोकजागृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले.
या वेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, श्री दिलीप जाधव, डॉ रूपा गायकवाड, परशुराम निवेणकर, श्री चव्हाण, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र स्टाफ, नॅब चे नलावडे सर आणि स्टाफ, अपरांत हॉस्पिटल चे डॉ भक्ती पालांडे, डॉ रजनीश रेडीज, श्री राजीव कांबळे, श्री जवाहर चंदनशिवे, नर्सिंग स्टाफ पौर्णिमा व रेवती, लायन्स क्लब चे श्री चंद्रकांत कुलकर्णी, सौ पेडांबकर, सौ सावर्डेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य शिबिराचा 70 ग्रामस्थांनी लाभ घेतला.
फोटो : लोकजागृती फाऊंडेशन रत्नागिरी च्या अध्यक्ष मीनल काणेकर यांचे ग्रापंचायतींच्यावतीने स्वागत करताना सरपंच