(पाटपन्हाळे /वार्ताहर)
जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाचे स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेतील कोंडवाडी येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन सोहळा नुकताच गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे, गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे, ग्रामविकास अधिकारी बदड, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, बांधकाम अभियंता वैभव चौधरी, माजी सभापती सुनील पवार, अमरनाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य श्री. चंद्रकांत तेलगडे, श्री.शब्बीर शेख, श्री. रुपेश विचारे, श्री.मनेश कदम, श्रीमती. कस्तुरी खैर, कु.आस्मा साल्हे, श्रीम चैताली कदम, श्री.विनायक मुळे, श्री. सुधाकर चव्हाण, श्री.प्रकाश चव्हाण, श्री. रामचंद्र तेलगडे, श्री. गणपत पागडे, श्री. सुहास गावडे, श्री.अंकुश तेलगडे, श्री. विकास गावडे, श्री. तुकाराम घाणेकर, श्री. रघुनाथ पागडे, श्री.संदीप कारकर, श्री.महेंद्र गावडे, विजय पागडे, श्री. कृष्णा गावडे, श्री. संदेश तेलगडे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.