(संगमेश्वर)
तालुक्यातील कोंडगाव जोशीवाडी येथील देवेंद्र काशिराम जोयशी (वय सुमारे ५३) याने राहत्या घरी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घरातील सर्व माणसे झोपलेली असताना हा प्रकार घडला. पोलिस पाटील यांना खबर मिळताच जोयशीवाडी येथे जाऊन घटनेची खात्री केली आणि तेथील सुरेश जोयशी यांना घेऊन साखरपा पोलिस दूर क्षेत्रात खबर दिली.
पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलिस नाईक वैभव कांबळे, मारुती शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण मात्र पोलिसांना समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, पत्नी, आई, वडील असा मोठा परिवार आहे.