(रत्नागिरी)
कॉलेजला जाण्याचा कंटाळा आलेल्या मुलाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमर याला कॉलेजला जायचा कंटाळा आल्याने रागाच्या भरात त्याने वडिलांनी पावसाळ्यात गवत मारण्यासाठी वापरलेली टिलक्वेंट नावाचे विषारी औषध गुरांच्या गोठ्यात ठेवलेले विषारी औषध प्राशन केले. घरात कुणी नसताना अमर याने विषारी औषधात पाणी टाकून प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला
अमर वर हॉस्पिटलमध्ये त्याची गेले काही दिवस सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. रत्नागिरी तालुक्यातील अमर दीपक घाणेकर (१८), रा. देवूड पिंपळवाडी असे या युवकाचे नाव आहे. अमर हा इयत्ता अकरावी शिकत असलेला जाकादेवी हायस्कूलचा विद्यार्थी होता. या युवकाने गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी रागाच्या भरात गवत मारण्याचे विषारी औषध पाण्यात टाकून प्राशन केले होते. यानंतर त्याला रत्नागिरी येथील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तात्काळ त्याला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
हे औषध घरात कोणीही नसताना त्याने स्वत: त्यामधील थोडे पाण्यात टाकून प्यायल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. वैद्यकीय उपचारांची शर्थ केल्यानंतरही त्याला यश आलं नाही. त्याच्या आईवडिलांची परिस्थिती बेताची असून त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यापेक्षा आई-वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे. रत्नागिरी तालुक्यात देऊड गावात त्याच्यावर शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.