(ठाणे)
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात सिनिअर विद्यार्थ्यांनाकडून ज्युनिअरना अमानुष शिक्षा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण येते. दरम्यान, विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्याला बेदम मारहाण केली जाते. महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ शूट केला. याबाबत महाविद्यालयातील प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे अश्वासन त्यांनी दिले.
व्हिडिओमध्ये महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोके आणि पायावर उभे करण्यात आले. त्यांच्याबाजूला एनसीसीचा सिनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडके घेऊन उभा आहे. विद्यार्थ्याने थोडीही हालचाल केल्यास त्यांना अमानुषपणे मारहाण केली जाते. आपले करिअर उद्ध्वस्त होईल, या भितीने कोणाताही विद्यार्थी याबाबत तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याचे समजते.
या संपूर्ण घटनेवर सुचित्रा नाईक म्हणाले की, “एनसीसीचे हेड हे विद्यार्थीच आहेत. अशी गोष्ट व्हायला नको होती. यावर कारवाईची होणार आहे. ही घृणास्पद गोष्ट आहे”. तसेच शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असे त्यांनी आवाहनही केले आहे. मात्र यानंतरही भीतीपोटी विद्यार्थी स्वत:हून पुढे येण्यास धजावत नाहीत.