(रत्नागिरी/प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमी रत्नागिरी आयोजित कै. निखिल राजीव सावंत स्मृती चषक 2022 टी-ट्वेंटी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा या गेल्या 1 तारीख पासून सुरु असून आज रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना या मैदानावर खेळवला गेला. या अंतिम सामन्यात यंग स्टार उद्यम नगर संघाने फाईट क्लब मुरुगवडा संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावले या स्पर्धेमध्ये 24 संघाने सहभाग नोंदवला होता. सुमारे 450 क्रिकेट खेळाडूनी या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचे कौशल्य दाखवले.
विजेता यंग स्टार उद्यमनगर संघाला 50,000 रोख रक्कम व चषक व उपविजेता फाईट क्लब मुरुवाडा संघाला 30,000 रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले.बक्षीस समारंभावेळी रत्ना जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष किरणजी सामंत सचिव बिपीन बंदरकर कार्याध्यक्ष बाळू साळवी उपाध्यक्ष दीपक देसाई, सहसचिव बलराम कोतवडेकर, बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष प्रसन्ना आंबुलकर राजीव सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. अंतिम सामन्यातील सामनावीर ईशान गडकर, (यंगस्टार क्लब), उत्कृष्ट फलंदाज दीपक आडविलकर (यंगस्टार क्लब), उत्कृष्ट गोलंदाज पप्पू साळवी (यंग स्टार क्लब) , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हमजा खलीपा (यंगस्टार क्लब), स्पर्धेतील मालिकवीर साहिल मदार (फाईट क्लब) यांनाहि ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले.हि स्पर्धा यशस्वी पार पडावी म्हणून स्पर्धा प्रमुख दीपक देसाई, अमित लांजेकर, सुनील घोसाळकर,बलराम कोतवडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.