(खेड)
चाप्टर केस मिटवून देतो अस सांगत त्याबदल्यात ३ हजार रुपये मागणी करत ती स्वीकारताना खेड तहसीलदार कार्यालयातील चंपलाल महाजन डेढवाल या महसूल सहाय्यकाला रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे खेड महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे चाप्टर केस सुरु आहे. ती मिटवून देतो असे सांगून यातील खेड तहसीलदार कार्यालयातील आरोपी लोकसेवक चंपलाल महाजन डेढवाल (५२) या महसूल सहाय्यकाणे २८/१२/२०२३ रोजी ३०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाच ]लुचपत विभागाकडे संपर्क साधला होता. त्याप्रमाणे सापळा रचत चंपलाल महाजन डेढवाल याला रक्कम ३०००/- रुपये लाच स्वीकारताना पंचा समक्ष रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
याबाबतचा अधिक तपशील पुढीलप्रमाणे:
*युनिट – अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी*
▶️ *तक्रारदार*- पुरुष , वय 52 वर्षें
▶️ *आरोपी लोकसेवक* चंपलाल महाजन डेढवाल, महसूल सहाय्यक, तहसीलदार कार्यालय खेड, ता. खेड . जि. रत्नागिरी
▶️ *लाचेची मागणी-* 3,000/- रु
▶️ *लाच स्विकारली-* 3 ,000/-रु
▶️ *हस्तगत रक्कम* -3,000/-रु
▶️ *लाचेची मागणी* – दि. 28/12/2023 रोजी
▶️ *लाच स्विकारली* – दि. 11/01 /2024 रोजी
▶️ *लाचेचे कारण -*
तक्रारदार व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध तहसीलदार कार्यालय खेड येथे सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो असे सांगून यातील आरोपी लोकसेवक यांनी दिनांक २८/१२/२०२३ रोजी ३०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम ३०००/- रुपये आज रोजी आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पूढील कारवाई चालू …….
▶️ *सापळा पथक -*
पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला ,
पोहवा. संतोष कोळेकर ,
पोहवा.विशाल नलावडे.
पो. ना. दिपक आंबेकर
पो.कॉ. हेमंत पवार
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
श्री सुशांत चव्हाण
पोलीस उपाधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी .
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*
*मा.श्री. सुनिल लोखंडे सो,
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*
*मा.श्री.अनिल घेरडीकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
*मा.श्री.सुधाकर सुराडकर सो,अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र
▶️ तपासी अधिकारी
शहानवाज मुल्ला, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी
▶️आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी
मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी
*रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.*
संपर्क :-
१)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893
२) श्री सुशांत चव्हाण, DYSP , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.नं.9823233044
३) श्री शहानवाज मुल्ला, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो. नं. 7774097874
4) श्री अनंत कांबळे, PI लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी मो.न. 7507417072
३) *टोल फ्री:- १०६४*
चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करूया.