(मुंबई)
बहुतेक सर्व शेतकरी बांधवाना पीएम किसान योजनेचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात पोहोचला आहे. अनेक शेतकर्यांना त्यांच्या बँकेवर किंवा आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर याबाबत एसएमएस आले असतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत DBT द्वारे पात्र शेतकर्यांच्या खात्यात रु. १६,००० कोटी रु.च्या रूपात हस्तांतरित करण्यात आले आहेत. यावेळी ई-वायसी आणि प्रत्यक्ष पडताळणीमुळे ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता उशीरा येत आहे.
मात्र असले झाले नसल्यास, अगोदर तुमचे बँक खाते तपासा. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्याप पोहोचलेली नाही. तर, ई-केवायसी करूनही हप्ता मिळाला नाही तर पुढे तुम्हाला कुठे संपर्क साधावा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.
ई-केवायसी करूनही हप्ता येत नसेल तर येथे संपर्क करा
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: १८००११५५२६६
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१
पीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११—२३३८१०९२, २३३८२४०१
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: ०११- २४३००६०६
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: ०१२०-६०२५१०९
ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6000 रुपयांचा लाभ दिला जातो. PM-KISAN अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 2 लाख कोटींची मदत देण्यात आली आहे.