(जीवन साधना)
महामृत्युंजय मंत्र हा महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम असा सहज करता येण्याचा मार्ग आहे. महामृत्युंजय मंत्र हा श्री शंकराचा महामंत्र आहे. वसिष्ठ ऋषींनी या मंत्राचा महिमा श्री मृतसंजीवन स्रोतात वर्णिला आहे. हा मंत्र योग्य अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जाप करण्याचे विधान आहे. कारण यात काही विशेष अशा यौगिक क्रिया असतात ज्या केवळ अध्यात्मसंपन्न अशा गुरूंकडे असतात.
आपल्या धर्मग्रंथांत अशा अनेक मंत्रांविषयी सांगितले आहे, ज्यांचा जर आपण विधीपूर्वक जप केला तर प्रत्येक अडचणीपासून आपला बचाव होऊ शकतो. असाच हा एक मंत्र आहे महामृत्युंजय. मान्यता आहे की, या मंत्राच्या जापाने मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. या मंत्रामध्ये भगवान शिवच्या महिमेचे वर्णन आहे. ‘महामृत्युजंय’ चा अर्थ आहे मृत्यूला जिंकणारा…
हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. ह्या मंत्राच्या ध्वनी लहरींच्या कंपनातून शरीराभोवती दैवी शक्तीद्वारे एक अदृश्य दैवी कवच निर्माण केले जाते. हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व बाधांपासून रक्षण तर होतेच शिवाय केलेल्या सर्व कार्यात यश प्राप्ती होते. ह्या दिव्य कवचामध्ये ३३ देवता असतात जे महामृत्यूंजय मंत्रातील ३३ अक्षरांनी दर्शविले जातात. ह्या ३३ देवतांमध्ये ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य, १ प्रजापति, आणि १ षट्कार (इंद्र) आहेत असे प्राचीन धर्मशास्त्रात वर्णिले आहे.
असा आहे महामृत्युंजय मंत्र…
ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
मंत्र जाप करताना घ्या या गोष्टींची काळजी
1. सकाळी स्नान केल्यानंतर सावधानतापुर्वक या मंत्राचा जाप करा. बोलताना शब्दांची काळजी घ्या.
2. मंत्र जाप करताना धूप-दीप प्रज्वजित ठेवा. जाप केवळ रुद्राक्षाच्या माळेनेच करा.
3. मंत्राचा जाप त्या ठिकाणी करा जेथे भगवान शिव यांची मुर्ती, फोटो किंवा महामृत्युजंय यंत्र ठेवलेले असेल.
4. मंत्राचा जाप एकाग्रतेने करा. मनाला भटकू देवू नका.
5. जर स्वत: या मंत्राचा जाप करू शकत नासाल तर योग्य पंडितातर्फे या मंत्राचा जाप करून घ्यावा.
6. पहाटे ४:०० वाजता ब्रह्म मुहूर्तावर महामृत्युंजय जप करण्याचे अनेक फायदे आहेत.
महामंत्राचा जाप केल्याने कोणत्या बाधा दूर होतात…
ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रहदोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यसाठी.
स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी.
कुटुंब, समाज आणि संबंधामधील कलह दूर करण्यासाठी.
एखाद्या गंभीर आजाराच्या पीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी.
महामारीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी.
वात(वायू), पित्त (ताप), आणि कफ (शीत) दोषामुळे निर्माण झालेल्या रोगांपासून दूर राहण्यासाठी.
वैवाहिक संबंधामध्ये बाधक नाडी दोष किंवा इतर बाधक योग दूर करण्यासाठी.
मानसिक तणाव आणि क्रोधामुळे निर्माण झालेली अस्वस्थता नष्ट करण्यासाठी.
अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्तीसाठी.
महामृत्युंजय मंत्र जाप केव्हा केला पाहिजे?
जेव्हा एखाद्या व्यक्तिसोबत लहान अशा दुर्घटना होतात, तेव्हा हा मंत्र जप केल्यास लाभ होतो
निद्रेत अचानक बिघाड होऊन रात्री वारंवार झोप उघडणे
अंगाचे कापरे होऊन भीती वाटणे
निद्रेतून भय उत्पन्न होणारे स्वप्न येऊन दचकून जाग येणे
घरातील गाय अथवा कुत्र्याचे अचानक निधन होणे
घरात लावलेली वृक्ष अथवा वनस्पती अचानक वाळून जाणे
जे कार्य सामान्यपणे झाले पाहिजेत ते थांबणे
जेव्हा घरात कुणी व्यक्ती सतत आजारी असेलअशा वेळी हा मंत्र जप केल्यास लाभ होतो
कुठल्याही बाबतीत सतत चिंता भेडसावणे