(जाकादेवी,/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील केळये गावचे रहिवासी आणि भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा केळये भिमोद्यानचे सदस्य मंगेश गणपत जाधव यांच्या पत्नी रेश्मा मंगेश जाधव यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी दि. २७ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा सम्यक, सासू, दिर असा परिवार आहे.त्या अतिशय मनमिळाऊ व कष्टाळू होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा पुण्यानुमोदन विधी मंगळवार दिनांक ७ मार्च रोजी स ११.३० वाजता जांभूळ फाटा विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे.