(रत्नागिरी)
तालुक्यातील केळये येथील विठ्ठल रखुमाई मंदिर केळये देवस्थानाने यांनी 50 वर्षापूर्वीची परंपरा आजही जपली आहे. उद्या गुरुवार 30 मार्च रोजी रामनवमिनिमित्त केळये येथे सत्यनारायण पूजा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम
गुरुवार 30 मार्च – सकाळी 10 वाजता सत्यनारायण पूजा, दुपारी 12 वाजता रामजन्म आणि आरती, रात्री 7.30 वाजता महाआरती आणि भोवत्या कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 वाजता वैभव पांचाळ यांचे पट्ट शिष्य कु. सुनील मिरजुळकर, सैतवडे यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल रखुमाई देवस्थान केळये यांनी केले आहे.