( चेन्नई )
आयपीएलच्या ६१व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. कोलकाताच्या विजयाचे हिरो रिंकू सिंग आणि नितीश राणा ठरेल. दोघांनी अर्धशतकी खेळी केली.
रिंकू सिंग आणि नितिश राणा यांनी चेन्नईच्या गोलंदाजीची जोरदार धुलाई केली. त्यामुळे केकेआरच्या संघाला यावेळी विजयासह आपले आव्हान जीवंत ठेवता आले आहे. या सामन्यापूर्वी केकेआरचे १० गुण होते, पण या विजयानंतर आता त्यांनी प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवले. चेन्नईने यावेळी केकेआरपुढे विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रिंकू आणि राणा यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला
आयपीएल २०२३ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने रिंकू सिंग आणि नितीश राणा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेचा ६ गडी राखून पराभव केला. सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा केल्या.