(रत्नागिरी)
प्रधानमंत्री आवास योजनेत 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय असे काम केलेले आहे. या कालावधीत 9 तालुक्यांसाठी 5968 घरांचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 5952 घरांना मंजूरी देण्यात आली. त्यापैकी 5642 घरे बांधून पूर्ण झाले, हे प्रमाण 94 टक्के इतके आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत रत्नागिरी जिल्हयाने केलेल्या कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. केंद्रशासन पुरस्कृत या योजनेत सन 2021-22 साठी 4364 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड आणि प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि. प. रत्नागिरी अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पारधी घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, आदिम जमाती घरकुल योजना इत्यादी योजना राबविल्या जातात.
राज्य पुरस्कृत रमाई घरकुल योजनेंतर्गत सन 2016 ते 2021 या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्हयाकरिता 5684 उद्दिष्ट प्राप्त होते. प्राप्त उद्दीष्टाप्रमाणे 100 टक्के मंजुरी देण्यात आली असून 5211 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे व उर्वरित 473 घरकुलांची बांधकामे प्रगतीत आहेत.
20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीमध्ये महा आवार अभियान 2020-21 राबविण्यात आले. सदर महा आवास अभियानांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कोकण विभागात सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून व्दितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत कोकण विभागात सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून प्रथम क्रमांकाने विभागीय आयुक्त विलास पाटील (भा.प्र.से.), कोकण विभाग, कोकण भवन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून 03 सप्टेंबर 2021 रोजी गौरविण्यात आले.
राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेंतर्गत 2021-22 करिता 1000 चे उद्दीष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 355 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असून उर्वरित घरकुलांना मंजुरी देण्याची कार्यवाही सुरु आहे. तथापि मंजुरी दिलेल्या घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना अंतर्गत सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत 179 तर सन 2021-22 करिता 59 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. शबरी आवास योजना अंतर्गत सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीमध्ये प्राप्त उद्दीष्टनुसार ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असून 168 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर 11 घरकुलांचे बांधकाम प्रगतीत आहेत. सन 2021 -22 प्राप्त उद्दिष्टांन्वये 53 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुर घरकुलांपैकी 1 घरकुल पुर्ण झाले असून 52 घरकुलांचे बांधकाम प्रगतीत आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनांतर्गत सन 2021-22 करिता 95 उद्दिष्ट प्राप्त झाले असून सदर उद्दिष्टानुसार मंजुरी देण्याची कार्यवाही सुरु आहे. आदिम जमाती आवास योजनांतर्गत 8 चे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 5 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 5 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.