(नवी दिल्ली)
केंद्रीय कर्मचा-यांचा पगार वाढीबाबत लवकरच खुशखबर मिळणार आहे. त्यांच्या डीए वाढीबाबत सरकार काही दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. डीए वाढवण्याचा निर्णय येत्या १५ दिवसांत होऊ शकतो. महागाई भत्ता वाढणार वाढल्याने पेन्शनधारकांची महागाईतून सुटका होणार आहे.
पुढील महिन्यात १ मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. महागाई पाहता उद्योगक्षेत्रातील कामगारांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
महागाई किती वाढली आहे हे पाहून केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या भत्त्यात वाढ करण्यात येत असते. महागाई जितकी जास्त तितका डीए वाढतो. ही उद्योगक्षेत्रातील कामगारांसाठी किरकोळ महागाई आहे. उद्योगक्षेत्रातील कामगारांच्या किरकोळ महागाईचा विचार करता यावेळी डीए ४.२३ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. सध्या केंद्रीय कर्मचा-यांचा डीए ३८ टक्के आहे. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर तो ४२ टक्के होईल.