केंद्र शासनाने १५ आयोगातील व्या वित्त ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला मागील दोन वर्षांत २२४ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रस्ते, नळपाणी योजना, पाखाड्या यासह शैक्षणिक गरजा, गावांमधील पायाभुत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आराखड्यातील ७० टक्केहून अधिक कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पुढील वर्षभरात ग्रामीण भागात विकासगंगा येणार आहे.
जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्तचा निधी उपलब्ध झाला आहे. २०२१-२२ या वर्षातील दुसरा हप्त्यापोटी १९ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. त्यामुळे २०२१-२२ यावर्षी दोन टप्पे मिळून ९ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी आला आहे. २०२० – २१ ला १३० कोटी ९ लाख रुपये आले. जिल्ह्यात ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. पहिल्या वर्षीच्या आराखड्यात ६४६ कामे घेण्यात आली असून त्यातील ५५२ कामांना तर दुसऱ्या वर्षीच्या मंजूर ४५६ पैकी ३०८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.