(लांजा)
लांजा परिसरात कॅफिनयुक्त थंड पेय विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लांजा च्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांना बुधवारी सादर करण्यात आले.
लांजा शहरात कॅफिनयुक्त थंड पेय यामध्ये स्टिंग, फ्रेश एनर्जी, चार्ज अशा प्रकारच्या अनेक कंपन्यांची थंडपेय विक्री केली जात आहे. यातील बरीचशी थंडपेय १८ वर्षा खालील लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करणारी आहेत. लहान मुलांमध्ये अशा प्रकारचे कॅफेयुक्त थंड पेय पिण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र या प्रकारच्या थंड पेयांमुळे मुलांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करून अशा पेयांपासून होणार धोका लक्षात घेऊन अशा अशा प्रकारच्या पेयांवर लांजा शहरात विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा लांजा च्या वतीने करण्यात आले आहे.
सदर निवेदन सादर करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लांजा तालुका प्रमुख मनोज देवरुखकर आणि शहराध्यक्ष दिलीप लांजेकर हे उपस्थित होते.