खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची जून महिन्यात कॅनडात हत्या झाली. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित तनेजा म्हणाले की, खासदार मान यांनी लोकसभेत जाण्यापूर्वी भारतीय संविधानाची शपथ घेतली होती. आता त्याच संविधानाच्या विरोधात ते देशाचे तुकडे करण्याचा कट रचत आहेत. पण, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. पंजाबमधील हिंदू-शीख बंधुत्व हे त्याचे उदाहरण आहे.
सरे येथील श्री गुरू नानक गुरुद्वारामध्ये तीन भारतीय राजनैतिक अधिकार्यांच्या हत्येची मागणी करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. याचा अध्यक्ष हरदीपसिंग निज्जर होता. या गुरुद्वारासमोर निज्जरची हत्या करण्यात आली होती. 21 ऑक्टोबर रोजी खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा ‘किल इंडिया’ अशा घोषणा देत व्हँकुव्हरमधील भारतीय दूतावासासमोर कार रॅली काढण्याची योजना आखली आहे.
कॅनडात याला मोठा विरोध होत आहे. भारतीय वंशाचे जोगिंदरसिंग बसी म्हणतात की, काही लोक भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडवत आहेत. खलिस्तानी आणि कट्टरतावाद्यांना भारत तोडायचा आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडातील भारतीय राजदूताच्या हत्येसाठी लोकांना प्रवृत्त करणे, हा मोठा गुन्हा आहे.