(रत्नागिरी)
जल शक्ती अभियानांतर्गत ‘कॅच द रेन 2022’ मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते. ही मोहिम रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 29 मार्च ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीत 1 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. सभेमध्ये जल शपथ घेणे, जनजागृती करणे, पाऊस पाणी संकलन करणे, पाणी स्त्रोतांची गणना करणे, पारंपरिक पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण, बंद असणारे पाणी स्त्रोत नव्याने सुरु करणे व पुनर्वापर, पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, हरित क्षेत्र वाढविणे अशा अनेक विषयांवरी ग्रामस्थाचा सहभाग घेऊन कॅच द रेन मोहिम यशस्वी करावयाची आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांना याविषयी डॉ. जाखड यांनी मार्गदर्शन केले.