(निवोशी/गुहागर : उदय दणदणे)
आयुष्यात प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो आणि मनाशी जिद्द बाळगतो की पाहिलेलं स्वप्न काहीही झालं तरी पुर्ण करायचंच. मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते करण्याची हिंमत ठेवत असतो आणि ते स्वप्न साकार करतो. असंच एक स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी सज्ज झालं आहे “झुंजार प्रोडक्शन”.
श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबई निर्मित, कोकण कट्टा व आम्ही कोकणकर आयोजित, झुंजार प्रोडक्शन प्रस्तुत दोन अंकी मराठी नाटक “लढा.” मुंबई सारख्या मायावी नगरीत आणि प्रथमच मोठ्या रंगमंचावर घेऊन येत आहेत एक नवं कोरं मराठी नाटक आहे “लढा ”
या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक कृष्णा येद्रे ह्यांच्या वास्तवदर्शी लिखाणातून आणि त्यांचा दूरदृष्टी मधून आणि त्यांचे सहकारी या नवीन कलाकृतीचं दर्शन घडवणारं आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत नावारूपाला असलेले तब्बल २७ नामवंत कलाकार ह्या नाटकात आपली भूमीका साकारणार आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग होत असलेल्या “लढा” या नाटकाकडे तमाम नाट्य प्रेमी रसिकांत उत्सुकता शिगेला लागून राहिली आहे.
नक्की लढा कशासाठी? कुणासाठी? काय असेल या नाट्य कलाकृती मध्ये? अशा विविध पैलूंचा उलगडा होईल
शनिवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२रोजी ठीक रात्री०८.वाजता. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह ( विलेपार्ले ) मुबंई येथे. कौटुंबिक,सामाजिक विषयाला गवसणी घालणाऱ्या “लढा” या नाटकाला तमाम नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन नाट्य लेखक/दिग्दर्शक – कृष्णा येद्रे यांनी केले आहे.