( चिपळूण / ओंकार रेळेकर)
खडपोली एम.आय.डी.सी. येथील कृष्णा अँटिऑक्सिडंटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा वर्धापन दिन 8 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिनाचे औचित्य साधून कंपनीच्या तीन युनिट्स मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन चिपळूण तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर सौ.ज्योती यादव तसेच कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अशोक पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर कंपनीचे डायरेक्टर टी. आर. रहमान सर यांनी सदिच्छा भेट दिली व रक्तदानाच्या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच रक्तदात्यांचाही सन्मान केला. शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त श्री.शंतनू मलिक, श्री.प्रमोद यादव श्री.संजय जाधव, श्री.विनायक सुतार, श्री. सुयोग चव्हाण, संजय मनवल, नामदेव शिरडवडे, श्री.अरुण गायकवाड, श्री. रविंद्र रोकडे, श्री. सिद्धेश मुळे,श्री. म्हामुणकर, श्री. आशिष चोचे, श्री. चंचल महंती, श्री.अभीक गुप्ता आदि कंपनीचे सर्व अधिकारी तसेच तब्बल 80 वेळा रक्तदान करणारे ब्लडलाईन ग्रुपचे श्री.मिलिंद चितळे तसेच ब्लडलाईन ग्रुपचे संस्थापक श्री. अमोल टाकळे तसेच सौ. मानसी टाकळे आदी मान्यवरही उपस्थित होते. सदर शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
तसेच शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या रेडक्रॉस रक्तपेढी, रत्नागिरी यांनाही सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतामध्ये सन्माननिय डायरेक्टर टी. आर. रहमानसर, व्हाईस प्रेसिडेंट श्री. अशोक पाटील सर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ.ज्योती यादव मॅडम या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये वर्धापन दिनानिमित्त सदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक आणि त्यांचे सगळे सहकारी तसेच तिन्ही युनिट मधील रक्तदाते या सर्वांचे कौतुक केले व स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देतानाच प्रतिवर्षी कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त 8 मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाईल असे जाहीर केले.
सदर शिबिरामध्ये 60 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. या सर्वांना रेडक्रॉस रक्तपेढीच्या वतीने तसेच कृष्णा अँटीऑक्सिडंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने देखील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर शिबिराच्या आयोजनासाठी कंपनीच्या सर्व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. तसेच सदर शिबिरासाठी ब्लडलाईन ग्रुप चिपळूणचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे यांनी केले.