(दापोली)
कृषी महाविद्यालय दापोली येथील शिकत असलेल्या तृतीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी जालगाव येथील लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांना माती परीक्षण बद्दल मार्गदर्शक माहिती दिली.
माती परीक्षणचे फायदे व हे परीक्षण दरवर्षी करून योग्य खत व कोणते पीक या मातीमध्ये जास्त उत्पादन देईल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिली.