कृषीची दुकाने बंद का ? ती दिवसभर उघडी असुद्या आशा सक्त सूचना दापोली प्रांत अधिकारी यांना खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथील आढावा बैठकीत दिल्या. दापोली पंचायत समिती सभागृह येथे त्यांनी दापोलीतील तौक्ते चक्री वादळ आणि कोविड याचा आढावा घेतला.
यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम,बाबाजी जाधव, उप सभापती ममता शिंदे राष्ट्रवादी, पक्ष प्रवक्ते मुजीब रुमाणे, माजी सभापती राजेश गुजर, प्रांत अधिकारी, तहसीलदार तसेच विविध खात्याचे अधिकारी आढावा बैठकी वेळी उपस्थित होते. दापोली आजही ५५० रुग्ण कोरेटाईन आहेत. मात्र येथे परिपूर्ण सुविधा नसल्याने रुग्णाचे हाल होतात त्या साठी कोरेटाईन सेंटर वाढवा तालुक्या साठी एकच रुग्ण वाहिका असल्याने ती अपुरी पडत आहे या साठी खाजगी रुग्ण वाहिका भाड्याने घ्या असे देखील या वेळी तटकरे यांनी सांगितले. तिसरी लाट येईल असे तज्ज्ञांन कडून वर्तविले जात आहे आणि याचा अधिक धोका हा लहान मुलांना असेल अशी भीती देखील तटकरे यांनी वर्तविली. त्यासाठी यंत्रणेने आणि स्थानिक प्रशासनाने सतर्क रहा अश्या सूचना देखील दिल्या.
तौक्ते चक्रीवादळात आंबा काजूचे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून प्रयत्न करणार आणि केंद्राकडे देखील भरपाई मिळावी म्हणून पर्यंत करणार असे खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठकी दरम्यान बोलताना सांगितले.
केंद्राकडून गुजरातसाठी एक हजार कोटींची मदत दिली जाणार त्याच धर्तीवर अन्य राज्यांना देखील मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.