(दापोली / कोळथरे)
रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील विदयार्थी ग्रामीण उदयोजगता जागरूकता विकास कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम या चतुर्थ वर्षातील् कृषीसाखी व अग्रीकॉस गटाने कोळथरे गावात रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जि. प. पू. प्र. मराठी शाळा कोळथरे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. महिलांनी गावामध्ये उपलब्ध असलेल्या रानभाज्यानपासून नवनवीन पाककृती बनवल्या तसेच विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. ए. सावंत यांनी रानभाज्यांचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच कोळथरे गावाच्या माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मा. सौ. ज्योती महाजन यांनीही रानभाजांचे फायदे समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अंजनी सनकुळकर, गावच्या पोलिस पाटील श्रीम. शिल्पा सनकुळकर व मुख्याध्यापिका सौ. स्नेहल बुरटे या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. तसेच विषय तज्ञ डॉ. राठोड, डॉ. काळे व कार्यक्रमाधिकारी डॉ. झगडे व डॉ. शिगवण यांनी आपली उपस्थिती दाखवली. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.