(रत्नागिरी)
शहरातील कुसुमताई सहकारी पतसंस्थेची 2023 ते 2028 साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सर्व सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, असे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी सांगितले.
या निवडणुकीत दत्तात्रय अनंत शिंदे, सतीश मधुसूदन शेवडे, विजय कृष्णाजी बेहेरे, प्रमोद मनोहर रेडीज, प्रसन्न वैजनाथ दामले, अविनाश सखाराम जोशी, महेश गंगाराम सागरे, सौ. तेजा रवींद्र मुळये, सौ. लीना नरेंद्र घाडीगावकर, अनंत भागा कोकरे हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोनामुळे दोन वर्ष निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय अधीक्षक एस. डी. तोडणकर यांनी काम पहिले. संस्थेने आतापर्यंत सभासदांना व ठेवीदारांना योग्य त्या सोयीसुविधा दिल्या आहेत. उत्तम वसुली व प्रत्येक वर्षी नफा व सातत्याने मिळणारा ऑडीट अ’ वर्ग ही संस्थेची बलस्थाने आहेत. जुन्या संचालाकांबरोबर काही नवीन संचालकांना संधी देण्यात आली असून नवीन संचालक उत्तम प्रकारे पतसंस्था वाढीसाठी काम करतील, असा विश्वास प्रा. नाना शिंदे यांनी व्यक्त केला. कुसुमताई पतसंस्थेने आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य केली आहेत.