(रत्नागिरी)
शहराजवळील कुवारबाव-रवींद्रनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.
कौशल किसन लाळीकर (वय २२, रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी निदर्शनास आली. कौशल दुपारी जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत गेला होता. तेथेच त्याने अज्ञात कारणातून गळफास घेतला. शुक्रवारी चारच्या सुमारास नातेवाईकांनी पाहणी केली असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.