(रत्नागिरी/प्रतिनिधी)
ग्रामपंचायत कुवारबाव अंतर्गत रवींद्र नगर नळपाणी योजना ही बहुप्रतीक्षित सन 2013 पासून आजतागायत सुरु झालेली नाही. मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत लोकवर्गणीची सक्ती नसताना ग्रामपंचायतीला गुंगारा देऊन काही मंडळी बँक खात्यावर सन 2019 पासून कोणतेही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे पैसे गोळा करत होते. हे पैसे ग्रामस्थांना परत देण्यात आले आहेत़.
मागील काही वर्षापासून रखडलेल्या पैशांबाबत ग्रामपंचायतकडून कोणतेही उत्तर देण्यात येत नव्हते. डॉ प्रतिक झिमण व स्थानिक ग्रामस्थ यांच्या निवेदनानंतर 43 ग्रामस्थांनी जे पैसे सन 2019 पासून दिलेले होते, त्यांना पाणी तर आजतागायत मिळालेले नाही पण दिलेले पैसेसुद्धा परत मिळत नव्हते. पण डॉ प्रतिक झिमण व जागरूक नागरिकांनी दिलेल्या दणक्यानंतर रखडलेले पैसे परत देण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता लवकर पाणी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.