(खेड / भरत निकम)
खेड तालुक्यातील कुळवंडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शिंदेवाडी येथील तरुण राजाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
राजाराम शिंदे हे गावचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचा गावातील जनसंपर्क आहे. ग्रामसभेसह अन्य बैठकीत ते हिरहिरीने सहभाग घेत होते. नव्या उमेदीने गावच्या विकासासाठी त्यांचा सहभाग हा नेहमीचा असतो. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचा संपर्क दांडगा असून गावातील वाडी-वस्तीला फायदा होणाऱ्या निर्णयात ते पुढाकार घेवून असतात. लोटे वसाहतीत नोकरी सांभाळून गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात ते हजर राहतात. गावातील वरिष्ठांच्या निर्णयाचा सदैव मान राखून समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
ग्रामदेवतेच्या आणि गावातील जेष्ठ मंडळींच्या आशिर्वादाने महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे कामकाज करताना कुणावरही अन्याय होवू नये, असे दिशादर्शक काम करण्याचा मानस असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.