(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर धाड टाकण्यात आली. ७ मे रोजी कुरतडे येथे तर ८ मे रोजी करबुडे या दोन ठिकाणी छापा टाकून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरतडे कातळवाडी येथून १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. दारू बाळगल्याप्रकरणी भक्ती मंगेश बीर्जे ( ५०, रा. कुरतडे कातळवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . तर खापरेवाडी येथे ८ मे रोजी टाकलेल्या धाडीत ४६० रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. जयवंत जनार्दन रेवाळे ( ३९ , रा . तळेकांटे रेवाळेवाडी ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.